Ad will apear here
Next
नवाब मलिक यांचे बापट यांच्यावरील आरोप मागे
पुणे : तूरडाळ प्रकरणात गिरीश बापट यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेतला आहे.

बापट यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात मलिक यांच्याविरुद्ध अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. मलिक यांनी लेखी निवेदन देऊन बापट यांच्यावरील आरोप मागे घेत आहोत असे स्पष्ट केल्याने बापट यांनी हा दावा मागे घेतला. मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बापट यांनी तूरडाळ प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी दिली व दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला म्हणून बापट यांना मंत्रीपदावरून काढून टाकावे, अशी मागणी केली होती.

या आरोपांना बापट यांनी न्यायालयात आव्हान दिले. जी डाळ जप्त करण्यात आली ती ५४० कोटी रुपयांची होती त्यामध्ये फक्त १४० कोटी रुपयांची तूरडाळ होती व मुक्त करण्यात आलेल्या डाळींची किंमत ४३ कोटी रुपयांची होती. त्यामुळे याप्रकरणात भ्रष्टाचार झाला नाही असा दावा बापट यांनी केला. मलिक हे स्वत: मंत्री होते, त्यांच्यावरही अनेक आरोप झाले होते. याकडे बापट यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मलिक यांनी बापट यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप करायचे नाहीत, असे न्यायालयात लिहून दिले. या व्यवहारात बापट यांच्याकडून कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असेही त्यांनी न्या. सय्यद यांच्यासमोर नमूद केले. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून तडजोडीचा मसुदा द्यावा अशी सूचना केली. ती उभयपक्षी मान्य करण्यात आली व आज हा दावा तडजोडीने मागे घेण्यात आला. या खटल्यात बापट यांच्या वतीने अॅड. एस. के. जैन यांनी काम पहिले.

या संदर्भात बोलताना बापट म्हणाले, ‘लोकायुक्तांसह आता न्यायालयानेही मला क्लिन चीट दिली आहे. मी व्यक्तिगत जीवनात कोणतेही आरोप सहन करत नाही. म्हणूनच मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. प्रत्यक्षात आम्ही ५१ कोटी रुपयांच्या डाळींचे वाटप केले. त्यावर आठ हजार कोटी, कोणी १० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला. त्यातून मी आता निर्दोष मुक्त झालो आहे. सरकारी धोरणांवर आरोप करायला माझी काहीच हरकत नाही मी त्यांचे स्वागत करेन.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPXBS
Similar Posts
‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला पूणे येथे होत असून, त्यानिमित्त राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभाही याचदिवशी पार पडणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
‘राष्ट्रवादीचे पुणे येथे होणारे राष्ट्रीय संमेलन रद्द’ मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २३, २४ जून रोजी पुणे येथे होणारे राष्ट्रीय संमेलन रद्द करण्यात आले आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील
‘...तर राहुल गांधींना विरोध करण्याचा अधिकार नाही’ मुंबई : ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत, तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language